सिल्लोड (प्रतिनिधि) सिल्लोड तालुका वकील संघाच्या वतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयामधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत मोटरसाइकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर न्यायालय आवारामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
सिल्लोड न्यायालयाचे सह दिवाणी न्यायधिश श्री. के. टी. अढायके तर प्रमुख पाहुणे म्हणून दुसरे सह दिवाणी न्यायधिश श्री. एम.व्ही. किरमे व तिसरे सह दिवाणी न्यायधिश श्री. ए.एच.तट्टु साहेब तसेच सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे व शिवजन्मत्सोव समीतीचे अध्यक्ष ॲड. शेख उस्मान ताहेर हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिव पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजन्मउत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. शेख उस्मान यांनी केले तर मा.न्यायमुर्ती श्री. के. टी. अढायके, श्री. एम.व्ही. किरमे व श्री. ए.एच.तट्टु यांनी उपस्थितांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडले. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अशोक दादा तायडे, सचिव ॲड. हमीद खान यांच्यासह अॅड.संतोष झाल्टे, अॅड.डि.बी.जैवळ, ॲड. अभय देशपांडे, अॅड. जे.पी.मगर, अॅड. इरफान पठाण, अॅड.ए.एस.लोखंडे, अॅड.विलास आर.महाजन, अॅड.के.एस.मोटे , अॅड. जि.टी.साखरे, अॅड. बी.के.दांडगे, अॅड. जि.व्हि.ढोणे, अॅड.व्हि.आय.मंडलेचा, अॅड. एस.आर काकडे, ॲड. जी. एस. आरके, अॅड. एस.एस.दौड, अॅड. एस.के.ढाकरे, अॅड. एस.जी.बोराडे, अॅड. एम.एस.पंडीत, अॅड. एस.वाय.गुळवे, अॅड. इम्रान खान, अॅड. सय्यद रिजवान, अॅड. नजीर तडवी, अॅड. विजय खंडाळकर, अॅड. अंकुश गव्हाणे, अॅड.ए.एस.निकाळजे, अॅड.विशाल शेजुळ, अॅड.विशाल सुरडकर, अॅड. के.पी.झलवार, अॅड. सदाशिव बडक, अॅड. कैलास इंगळे, अॅड. रुपाली चाटे आदीं सह न्यायालयीन कर्मचारी श्री.आनंद सुरडकर, शोभालाल विटोरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. राजेद्र एस. गोराडे तर ॲड. रविद्र ताठे यांनी आभार प्रदर्शन केले.
















