छत्रपती संभाजीनगर: विप्रो कन्स्युमर केअर अँड लाईटिंगचा प्रमुख ब्रँड असलेल्या संतूरने अगरबत्ती (धूपबत्ती) क्षेत्रात प्रवेश केला असून, संतूर अगरबत्ती लाँच केली आहे, जी खऱ्या चंदनाच्या लेपाचा वापर करून बनवली आहे. या लाँचद्वारे संतूरने घरातील वातावरण सुगंधित करण्याच्या (होम अँबियन्स) क्षेत्रात आपला विस्तार केला असून, चंदनावर आधारित उत्पादनांशी असलेल्या दीर्घकाळच्या विश्वासावर आधारित हा पुढचा टप्पा आहे. संतूर ब्रँड अनेक दशकांपासून आपल्या पर्सनल केअर उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करत आले आहे. या नवीन उत्पादनाच्या माध्यमातून, हा ब्रँड आपला तोच वारसा अगरबत्तीच्या क्षेत्रात पुढे नेत आहे, ज्यामध्ये मंदिरे आणि घरांमध्ये पारंपरिकपणे वापरल्या जाणाऱ्या खऱ्या चंदन लेपाचा मुख्य घटक म्हणून वापर करण्यात आला आहे.संतूर अगरबत्तीची रेंज तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत: चंदन लेप, चंदन आणि मोगरा, चंदन आणि केसर. या सर्व अगरबत्त्या खऱ्या चंदनाच्या लेपापासून तयार करण्यात आल्या असून, त्या पारंपरिक आणि ओळखीचा सुगंध देतात
या लाँचबद्दल बोलताना, विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगच्या बिझनेस डेव्हलपमेंटचे जीएम उषासिस साहा यांनी सांगितले, “खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली संतूर अगरबत्ती सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रत्येक संतूर अगरबत्ती ही परंपरेचे प्रतीक आहे, जी शेकडो वर्षांपासून मंदिरे आणि घरांमध्ये दरवळणाऱ्या त्याच खऱ्या चंदन लेपाचा वापर करून ती तयार करण्यात आली आहे.”संतूर अगरबत्ती 125 ग्रॅमच्या झिपलॉक पॅकमध्ये आणि 20 ग्रॅमच्या पाऊच पॅकमध्ये स्थानिक किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असेल, या श्रेणीत एकूण सात वेगवेगळे एसकेयू असतील.या लाँचमुळे, संतूर एका नवीन श्रेणीत प्रवेश करत आहे, त्याचबरोबर अस्सलपणा आणि खऱ्या घटकांवर आधारित वेगळेपणा जपण्यावर संतूरने विशेष भर दिला आहे.
















