छत्रपती संभाजीनगर, दि.२० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२०) मुख्य इमारतीत अभिवादन कार्यक्रम झाला.
यावेळी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे, संचालक डॉ.सुधाकर शेंडगे, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.संजय कवडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
















