मुंबई : आज महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला असून २०२३-२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य बोर्ड दहावीच्या परीक्षेत कु.राखी महेंद्र सुरडकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे राखी सुरडकर ही गुरूनानक इंग्लिश हायस्कूल घाटकोपर, ची विध्यार्थीनी आहे व तिने दहावीत ९३.४० टक्के गुण मिळवित आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवून आई -वडीलांचे व शाळाचे नाव रोशन केले आहे.राखी सुरडकर हिने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल ज्ञानमंदीर क्लासेस से संचालक प्रदीप झोरे व गुरूनानक इंग्लिश हायस्कूल चे मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच आई वडील ,आजी-आजोबा यांनी तीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.राखी ला मिळालेलं हे यश पाहून राखी आणि तिचे आई वडील अतिशय आनंदी झाले आहेत. राखीच्या आई वडिलांनी बोलताना सांगतलं की, राखीला आम्ही कधी अभ्यास कर असे सांगितलंच नाही. तिने या यशासाठी भरपूर मेहनत घेतली. हे सांगताना आपल्याला राखीचा अतिशय अभिमान असल्याचे तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच तिला हे यश मिळाल्याचं सांगताना आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या यशाबद्दल तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.