पैठण शहरातील नवीन कावसण भागात असलेल्या डॉ सुनील गायकवाड यांच्या निंबार्क हॉस्पिटलच्या खोली क्रमांक ५ मध्ये मुंगी येथील विठ्ठल रामराव देशमुख वय ३७ वर्षे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पैठण पोलिसात पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी रोजी डॉ सुनील गायकवाड यांच्या निंबार्क हॉस्पिटलमध्ये मयत विठ्ठल देशमुख यांना ऍडमिट करण्यात आले होते. यावेळी डॉ गायकवाड यांनी त्याला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत त्याच्यावर उपचार सुरू केले. रविवारी मध्यरात्री विठ्ठल देशमुख याने उपचार सुरू असलेल्या कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केली.वार्ड बॉयमुळे ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या आत्महत्या प्रकरणी पैठण पोलिसांत नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास अंमलदार ठोकळ करीत आहे.