जालना प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त सोमवारी १२ एप्रिल रोजी छ. संभाजी नगर येथून आणलेल्या ३ फूट उंच व अष्ठधातूची तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी बारा वाजता पूज्य भदंत भिक्खू बोधीधम्मा यांच्या शुभ हस्ते करण्यात आली होती.
वडोद तांगडा मधील सर्व दानदाते यांनी या मूर्तीसाठी पुढाकार घेतला होता.त्यामुळे आज हा आनंदोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत भिक्खू बोधीधम्मा,प्रशिक बौद्ध विहार समिती व समस्त गावकरी मंडळी उपस्थित हाेते.
पूज्य भदंत भिक्खू बोधीधम्मा यांनी उपस्थितांना बुद्ध आणि त्यांचा धम्म समजावून सांगितले.
त्यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी ही भाषणे करत तथागत भगवान गौतम बुद्ध व महापुरुष समजावून सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून एस आर बोदाडे हायकोर्ट वकील छ.संभाजी नगर, तुषार आनंदा गवळी हायकोर्ट वकील छ.संभाजी नगर,प्राचार्य सुनील वाकेकर सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोशेगाव,व उद्धव बनसोडे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कृती समिती छ.संभाजी नगर,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक बौद्ध विहार समिती, व त्यांच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखून सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वा. पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुरुवात पंचशील ध्वजारोहण , बौध्द मूर्ती मिरवणूक,खिरदान,मान्यवरांचा सत्कार सोहळा, स्नेह भोजन व भीमगीतांच्या कार्यक्रमानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.