घाटकोपर मुंबई : प्रतिनिधी,
येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सोना मार्टिनर्टी आणि सर्जिकलं नर्सिंग होम,डिबीएम,सी एम एस फाउंडेशन यांच्या विद्यमानाने माता रमाबाई आंबेडकर नगरातील ३० विद्यार्थिनींना मोफत नर्सिंगचे प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली.
ही अनोखी संकल्पना राबवित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने डॉक्टर्स,नर्स व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सोना मॅटर्निटी आणि सर्जिकल नर्सिंग होम चे संचालक डॉक्टर हरीश अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी DBM चे परमजीत सिंग,CMS फाउंडेशन चे इस्माईल खान महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाटकोपर पूर्व शाखा अध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम,राजू हाश्मी व संघरक्षक गायकवाड त्यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर आणि उपस्थित मान्यवर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
उपस्थितांना संबोधताना डॉक्टर हरीश आहिरे म्हणाले की, कोणत्याही आजारासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. जेणेकरून गंभीर आजार टाळता येतील. डॉक्टरांना रुग्णाप्रति आदर भाव ठेवून सेवा करण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमामुळे आरोग्य सेवा आणि शैक्षणिक वातावरणाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
पुढे डॉक्टर पल्लवी अहिरे गायकवाड म्हणाल्या की, राष्ट्रीय डॉक्टर दिन हा वैयक्तिक जीवन आणि समुदायांमध्ये डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे.म्हणून रुग्णास सांगावसे वाटते की,जीवन खूप अनमोल आहे.ते निरोगी रहावे याकरीता काळजी घ्यावी.त्यामुळे व्यस्त व धावपळीच्या जीवनात असंतुलित आहाराच्या सवयीने अनेक आजार उद्भवतात.
कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व ‘ रुग्ण मित्र ‘ अविनाश कदम म्हणाले की, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे.त्यामुळे आम्ही जात,धर्म न पाहता आम्ही पक्ष व संस्थेमार्फत विविध आजारावर उपचार व्हावे याकरीता मुंबई येथे ठीक ठिकाणी शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णाच्या उपचारासाठी दिवस रात्र काम करत आहे.अशा प्रकारे उपस्थितांना आरोग्याबद्दल जागरूक केले.
DBM व CMS फाउंडेशन चे परमजीत सिंग आणि इस्माईल खान तसेच राजू हाश्मी, संघरक्षक गायकवाड त्यांनीही लोकांना आरोग्याबद्दल जागरूक केले.
त्याकरिता डॉ.पल्लवी अहिरे गायकवाड, डॉ. हरीश अहिरे व त्यांच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस उपस्थितांनी भर-भरून शुभेच्छा दिल्या. व पुढे कार्यक्रमाची सांगता करतेवेळी कार्यक्रम च्या शेवटी आयोजक यांनी सर्व मान्यवर व आदी चे आभार मानले.