विशेष प्रतिनिधी – ग्रामीण भागातील कष्टकरी शेतमजूरांचे मुले शिक्षण घेण्यासाठी शहरी भागात मोठ्या प्रमाणात आले.शिक्षण घेतांना त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला,पुढे शिक्षणामुळे नोकरीत सुद्धा अनेक लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाल्यामुळे सुरक्षित कायम स्वरुपी नोकरी मिळाली.पण ते संघटित झाले नाहीत,त्यांना बुलढाणा जिल्हा भूमिपुत्र म्हणून संघटित करण्याचे काम डॅा.दयानंद इंगळे,खरात,पवार,तायडे, गवई,भालेराव,अंभोरे,सारख्या काही लोकांनी केले. आणि बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई ची स्थापना करून रजिस्ट्रेशन केले.आज त्यांच्या मंडळात बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई रहिवासी बहुसंख्य कामगार,कर्मचारी अधिकारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले आहेत. त्यांचा वार्षिक स्नेह संमेलन आंबेडकरी विचारांचे व चळवळीचे केंद्र व प्रेरणास्थान म्हणजे प्रसिद्ध आंबेडकर भवन दादर मुंबई येथे दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
नोकरीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतर काही लोक गांव,नात्या व समाजातील लोकांपासून वेगळे राहतात.त्यांनी नात्यातील ग्रामीण भागातील खेड्यापड्यातील,गांवातील माणसं विसरू नये या सामाजिक बांधिलकीतुन बुलढाणा जिल्हा रहिवाशी मंडळ मुंबई ची स्थापना झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरीच्या शोधत असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना मुंबईत येऊन राहण्याची हक्काची जागा असावी त्यासाठी बुलढाणा जिल्हा रहिवाशी मंडळ मुंबई ने बुलढाणा बौद्ध भवन निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.त्यात सर्वानी सहभागी होऊन स्वप्न साकार करावे.आपसातील बंधुभाव वाढवावा यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे स्नेह संमेलन केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर अनेक पिढ्यातील जुन्या नात्यांना जोडणारा विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची चळवळ जीवंत करण्याची सामाजिक बांधीलकीचा लोक उत्सव ठरणार आहे. या स्नेहसंमेलनाचा सर्वात मोठा उद्देश विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे रक्ताचे वारसदार आनंदराज व भिमराव आंबेडकर यांना एकत्र आणून त्यांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या प्रशासनात एकेकाळी बुलढाणा जिल्हा भूमीपुत्र म्हणून प्रेरणादायी लक्षवेधी कामगिरी केलेले.मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान सिद्धार्थ खरात, मान.मिलिंद शंभरकर (आय.ए.एस) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा मुंबई,डॉ,राजेश गवांदे (आय.एफ.एस) प्रोटॉकॉल मंत्रालय मुंबई,तसेच बुलढाणा जिल्हा आंबेडकरी चळवळीचे भूषण मान. भिमराव तायडे,रामकृष्ण रजाने,व डॉ. अक्षय आंबेडकर ही मान्यवर मंडळी वार्षिक स्नेह संमेलनात उपस्थित राहणार आहेत.
स्नेह संमेलनाच्या निमित्याने समतेचा आवाज बुलंद करणारा व आंबेडकरी चळवळीला चेतना देणारा जागर समतेचा आंबेडकरी शाहीरी जलसा हा विशेष कलगुणांना वाव देणारा प्रेरणादायी लक्षवेधी प्रबोधनाचा कार्यकर्म ही आयोजित करण्यात आला आहे. या भव्य स्नेह संमेलनास सहकुटुंब मुलामुलीपासून ज्येष्ट नागरिका पर्यन्त सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे कळकळीचे आवाहन बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबईचे अध्यक्ष डॉ. दयानंद इंगळे सर यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्हा बौद्ध रहिवाशी मंडळ मुंबई, कार्यकारिणी मंडळ:- डॅा.दयानंद इंगळे,अध्यक्ष – 97027 77927,आयु.प्रल्हाद सोनूने- उपाध्यक्ष – 9420645830,आयु.अरुण अंभोरे,सचिव – 9224633354,आयु.वामन मोरे, सहसचिव- 9082189458,आयु.भास्कर पवार,खजिनदार- 9969131829,आयु.दिलीप भालेराव,सदस्य – 9870225644,आयु.राजेंद्र जाधव,सदस्य – 8898566340,आयु. रुस्तुम भालेराव,सदस्य – 966562217, आयु.सुभाष गवई,सदस्य – 9867463572,आयु.सीमा जाधव,सदस्य- 9820220992,आयु.विजय खरात,सदस्य – 8169963285,आयु..रमेश अडेलकर,सदस्य – 9082975404,आयु.ललिता पंडागळे,सदस्य – 9987239188,मुंबईत राहणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
सागर तायडे मुंबई यांस कडून














