सिल्लोड (प्रतिनिधी)माणिकनगर ता. सिल्लोड येथील छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे रोखपाल दिलीप मगर यांचा सेवानिवृत्तबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आज सोमवारी सकाळी माणिकनगर ता. सिल्लोड येथील छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखपाल दिलीप मगर यांनी जवळपास ३५ वर्ष बँकेत सेवा केली असून ते ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल सौ अनिता – दिलीप मगर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाखा व्यवस्थापक शेखर देशमुख, महेंद्र पवार, शाखा व्यवस्थापक महेश पाटिल, सुनिल काळे, नामदेवराव आहेर, अविनाश तायडे, रामदास सुलताने यांच्यासाह बँक कर्मचारी, बँक खातेदार, व विविध सेवा संस्था अध्यक्ष सदस्य उपस्थित होते. सोसायटी चेअरमन सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळी : *माणिकनगर ता. सिल्लोड येथील छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल दिलीप मगर यांचा सपत्नीक सत्कार करतांना बँक कर्मचारी व इतर मान्यवर* छायाचित्र रघुनाथ बोराडे.
















