छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : विश्वातील सर्व सजिवांचा अभ्यास करणारी ’जैविक शास्त्रे’ अर्थात ’लाईफ सायन्सेस’ ही अत्यंत महत्वाची शाखा आहे. या शाखेत मुलभूत तसेच उपयोजित दर्जेदार संशोधनाचे प्रमाण आणखी वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मा.कुलगुरु प्रा.ए.बिजू कुमार यांनी केले.
’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ वी वार्षिक परिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १३ व १४ फेब्रुवारी रोजी होत आहे. या निमित्त ’मॉर्डन ट्रेंडस इन लाईफ सायन्सेस’ या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात आली प्राणीशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित या परिषदेत १७० शोधनिबंध सादर होणार असून २५० संशोधक, शिक्षक सहभागी झाले आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची तयारी करण्यात आली. परिषदेचे उद्घाटन प्रा.ए.बिजूकुमार (कुलगुरु, युनिर्व्हसिटी ऑफ फिशरीज अॅण्ड ओशियन सायन्सेस) यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष तथा
विभागप्रमुख डॉ.सुनिता बोर्डे, सचिव डॉ.गुलाब खेडकर. कोषध्यक्ष डॉ.रमेश चौंडेकर , प्राचार्य डॉ राम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. बजाज इन्क्युबूशनचे संचालक डॉ.प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा.ए.बिजुकुमार म्हणाले, कोविड-१९ नंतरचे जग न्यू नॉर्मल म्हणून ओळखले जात आहे. या जगातील प्रश्नांचे स्वरूप बदलले असून अभ्यास व संशोधनाची पध्दतही बदलणे गरजेचे आहे. तर अध्यक्षीय समारोपात डॉ.प्रवीण वक्ते यांनी ’लाईफ सायन्सेस’ आणि फार्मास्टीक सायन्सेस यांच्यात सांगड घालने गरजेचे आहे, असे सांगितले. त्यांनी भविष्यातील प्राणिशास्त्रा कड़े संशोधकनी बदलत्या वेलेन्युसार बघण्याचा दृष्टिकोण ददलन्याची गरज असल्याचे नमुद केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा.प्रवीण वक़्ते म्हणाले , की हवामान बदल, प्रजाती नष्ट होणे आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या जागतिक आव्हानांना समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्राणीशास्त्रीय संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन एकत्रित करून, आपण परिवर्तनकारी उपाय काढू शकतो. वन्यजीव संवर्धन आणि परिसंस्थेच्या आरोग्यामध्ये आतड्यांतील सूक्ष्मजीवांची भूमिका एक्सप्लोर करणे,इकोफिजियोलॉजी, रिअल-टाइम जैवविविधता देखरेखीसाठी कमी-शक्तीच्या एआय चिप्स आणि छोटे एमएल मॉडेल्सचा वापर करणे या सारख्या अनेक विषय ही काळाची गरज आहे.
या परिषदेत दोन दिवसात चार सत्रात १७० शोधनिबंध सादर होणार आहेत, असे प्रास्ताविकात विभागाप्रमुख डॉ.सुनिता बोर्डे यांनी सांगितले. तर अत्यंत महत्वपूर्ण विषयावरील या परिषदेत विद्यार्थी, संशोधक व २५० शिक्षक सहभागी झाले, अशी माहिती परिषदेचे सचिव डॉ.गुलाब खेडकर यांनी दिली. प्रा.ईश्वर मुळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.रमेश चौंडेकर यांनी आभार मानले.
*आज समारोप*
शनिवारी दुपारी होणाऱ्या
समारोपास प्रा.शिवेश प्रताप सिंग, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेलचे संचालक डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या परिषदेत दोन दिवसातील विविध सत्रात डॉ.बिजु कुमार (केरळ), डॉ.मंजुलाल छप्रा (आंध्रप्रदेश) डॉ.एम.माधवी (तेलंगणा), डॉ.संदीप कुमार (नागालँड), डॉ.पी.एम.डोंगरे (मुंबई), डॉ.रवींद्रवाधन पिल्ले (तामिळनाडू), डॉ.उज्ज्वला देशमुख (अमरावती) व डॉ.अपर्णा कलावते (पुणे) यांची उपस्थिती राहणार आहे.परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.एन.डी.निंबाळकर, प्रा.एस.बी. गाडेकर, प्रा.एस.व्ही.पवार, प्रा.टी.एस.शेडोलकर, प्रा.ई.डी.मुळे आदी प्रयत्नशील आहेत.
















