नांदेड- मध्ययुगीन काळात 15 व्या शतकामध्ये या भारतभूमीवर अनेक साम्राज्यांनी आक्रमणे केली. अशा कठीण परिस्थितीमध्ये वीर शिरोमणी वीर महाराणा प्रतापसिंह यांनी परिवराची तमा न बाळगता अकबर मोगल साम्राज्याशी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊन मातृभूमीला सुरक्षित ठेवले, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 9 जून 2024 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मेवाडचे सम्राट, त्याग बलिदान, परिक्रमाचे प्रतीक, शुरवीर पराक्रमी राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या 484 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मेवाड, चित्तोडगड, हल्दाघाट, मांडलगड, मुक्तीसाठी रणांगण गाजविले. वेळप्रसंगी जंगलातील कंदमुळे खाऊन शत्रूशी झुंज दिली. याप्रसंगी लाडका चेतक नामक आश्वाने 26 फुट दरीवरून छलांग मारून चेतक आश्वाने शौर्य गाजविले. घायाळ अवस्थेत चेतक आश्वाने महाराणा प्रतापसिंह यांना सुरक्षित स्थळी पोहचवून चेतकने प्राण सोडला. पण महाराणा प्रतापसिंह यांचे प्राण वाचविले अशा या महान शूरवीर योद्ध्याचा कार्य आणि विचारांचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन देशाप्रती, समाजाप्रती कार्य करण्याची ही काळाची नितांत गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम आगाराचे बसस्थानक प्रमुख मा. श्री. याशीन हमीद खान यांच्या हस्ते श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख याशीन हामीद खान, नाभिक समाजाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अशोकराव खोडके, सहायक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेनके, वाहतूक निरीक्षक सचिनसिंह चव्हाण, सुधाकरराव घुमे, वाहतूक नियंत्रक राजेंदरसिंघ चावला, निर्दोष पवार, सुरेश फुलारी, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख अविनाश भागवत, बचित्तरसिंघ गाडीवाले, कर्मचारी संभाजी सूर्यवंशी, संजयसिंह आव्हाड, अनिल हंकारे, गंगाधर जोशी, ज्ञानेश्वर जाधव, गोविंद तेलंग, सुरक्षा रक्षक, माधवराव आरसूलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आगारातील कामगार, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.