‘बाई गं’ चित्रपटाचं पहिलं गाणं ” जंतर मंतर ” आऊट*
‘बाई गं’ चित्रपटाचं पहिलं गाणं ” जंतर मंतर ” आऊट*
छत्रपती संभाजीनगर – ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायकां असतील तर त्या पुरुषाची हालत काय असेल हे येत्या 12 जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून आपल्याला कळेल आणि आज ह्याच चित्रपटाची एक छोटीशी झलक “जंतर मंतर” या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळेते.
अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत आपला जलवा दाखवताना दिसतोय. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान ह्यांनी जंतर मंतर ह्या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगवली आहे. मितवा नंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांची जोडी ‘बाई गं’ ह्या चित्रपटात दिसणार आहे त्यामुळे ह्या जोडी चा एक वेगळाच फॅनबेस ह्या सिनेमा साठी उत्सुक आहे.
अवधूत गुप्ते, कविता राम, मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर ह्यांनी “जंतर मंतर” ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखाते ह्यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकर ह्यांनी लिहिले आहेत. “जंतर मंतर” हे गाणं आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंट वर पहायला मिळेल.
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर ह्याचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.
नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ चं गाणं “जंतर मंतर” रिलीझ होताच प्रेक्षकांना भुरळ घालतय हे नक्की एक अभिनेता आणि तब्बल ६ अभिनेत्री हि संकल्पनाच प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारी आहे. १२ जुलैला ‘बाई गं’ हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
