मुंबई प्रतिनिधी :-(संघसेन यांच्याकडून) भारतीय बौद्ध महासभेचे प्रसिद्धीप्रमुख प्रशिक सम्राट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई ज्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धांच्या मातृ संस्थेच्या गेल्या ४५ वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषविलेल्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा ९० वा वाढदिवस त्यांचे सुपुत्र व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी/राष्ट्रीय अध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव य आंबेडकर यांच्या व मीराताई यांचे नातू अमन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सार्वजनिक रित्या केक कापून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा कार्यक्रम डॉ आंबेडकर भवन, दादर येथे मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने नुकताच (दि. ५ मे २०२५ रोजी) आयोजित केला होता. यावेळी डॉ भीमराव य आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रिय कार्यालय प्रमुख अँड एस के भंडारे, माजी महासचिव व प्रसिध्द साहित्यिक ज वि पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रिय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड व भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू जी बोराडे व स्वातीताई शिंदे, नितिन मोरे,मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष चंदाताई कासले इत्यादींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अँड एस के भंडारे यांनी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट काम करणाऱ्या पुरुष, महिला व सैनिक यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचे आणि महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज या पुस्तकाची दुसरी आवृत्ती व सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथांची तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याचे जाहिर केले. तसेच मीराताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या कार्यकर्ते, शाखा यांनी देशभरात ११६ विविध शिबिरे आयोजित करून कार्यातून वाढदिवस साजरा केला. मुंबईतील महिला शाखा व पुरुष शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १४ उपासिका शिबिराच्या शिबिरार्थीना डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास भंते धम्मराज आणि त्यांचा संघ,राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख अँड. डॉ एस एस वानखडे, राष्ट्रीय सचिव बी एम कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी बी तेलतुंबडे,केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख रागिणीताई पवार व सचिव भारतीताई शिराळ, प्रशांत गडकरी , सोनाली कटरनवरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम आपल्यानंतर राजगृह वर जाऊन मीराताई यांना प्रत्यक्ष शुभेच्छा व केंद्रीय कार्यालयाच्या केंद्र, महाराष्ट्र मुंबई प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीने एक लाख रुपये धम्मदन देण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई प्रदेशचे अध्यक्ष विलास वानखडे होते. सूत्रसंचालन मुंबई प्रदेश सरचिटणीस दयानंद बडेकर आणि आभार प्रदर्शन मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई प्रदेशचे विलास ढोबळे, महादेव गायकवाड, अनिल पहूरकर, अर्जुन जाधव, मिलिंद कदम इत्यादींनी परिश्रम घेतले.