ठाणे/ बी.डी.गायकवाड :—- मराठी साहित्य क्षेत्रातील सूर्य नारायण म्हणून ओळखले जाणारे कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी गिरीश कंटे संपादित साहित्य गौरव ग्रंथाचे प्रकाशन नेरळ येथे होणार आहे.
पिपल्स पब्लिकेशन मुंबई आणि स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ग्रंथाचे प्रकाशन कवी ,गीतकार अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नागरिक सभागृह नेरळ येथे होत आहे.ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी कवी प्रा.प्रशांत मोरे, कवी तुकाराम धांडे यांची खास उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला जीवनदीप शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, विद्यासेवक सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष सुधीर घागस, कर्जतचे इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे,माथेरान नगर परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी,नेरळचे माजी सरपंच सावळाराम जाधव कवी डॉ.विलास वेखंडे उपस्थित राहणार आहेत.
ह्या कार्यक्रमाला साहित्यिक मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन पीपल्स पब्लिकेशन चे प्रा. हरेंद्र सोस्टे आणि स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान चे अध्यक्ष कल्पेश भोईर यांनी केले आहे
















