ठाणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची स्वायत्त संस्था, अंतर्गत
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानाचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, व भारतीय संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचावे, या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र भर विविध उपक्रम राबविण्यात आले, त्याचाच एक भाग म्हणून बार्टीचे महासंचालक सुनील वारे, बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, बार्टीचे विभाग प्रमुख ,सेवा व विस्तार बबन जोगदंड, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व आमदार विधानसभा, विधान परिषद आणि पालकमंत्री
यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात देण्यात यावा, या उपक्रमाअंतर्गत प्रकल्प अधिकारी श्रीमती मेघा पवार यांच्या मार्गदर्शनाने यशवंत वाघ समतादूत यांच्या मार्फत आमदार किसनजी कथोरे साहेब (मुरबाड विधानसभा) जिल्हा ठाणे.यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात देण्यात आला.














