छत्रपति सभाजीनगर :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GECA), उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे “WE” We for Environment तर्फे आयोजित ‘Seed Guardians 25’ या उपक्रमाचा बक्षीस वितरण, सत्कार आणि समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री चैतरामजी पवार यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनीताई लाठकर मॅडम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष युनूस पटेल, सेक्रेटरी किरण मास्ट, शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संजय डंभारे यांची उपस्थिती होती. श्रीमती मेघना बडजाते मॅडम यांनी we… we for environment संस्थेची कार्य प्रक्रिया आपल्या प्रास्ताविकेतून सादर केली.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत ५० शाळांमध्ये बीज प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
बीज प्रदर्शन आयोजन करणाऱ्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक तसेच पर्यावरण प्रमुखाचे यावेळी आभार मानण्यात आले.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर मधील २३ शाळेतील विद्यार्थ्यांनी व पर्यावरण प्रमुखांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
टाकाऊतून टिकाऊ साठी धनंजय बोंगाने पोस्टरसाठी संस्क्रुति पिवळ आणि प्रश्नमंजुषेमधे गायत्री गावंडर या विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळाला सर्वोत्कुष्ट रील साठी मनिषा महाजन ,उत्कृष्ट प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार श्री गजानन हरकळ यांना मिळाला. लिलाबाई त्रिंबकराव पाटील कन्या विद्यालय आडूळ यांना सर्वोत्क्रुष्ट शाळा पुरस्कार मिळाली अक्षरा सत्तावन या विद्यार्थिनीने पर्यावरणावर आपले मत व्यक्त केलेसहभाग नोंदविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन्सिल बॉक्स देऊन गौरविण्यात आले. यावेळी पर्यावरण प्रेमी शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती देशपांडे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वी चे कमल पहाडे, संजय आंबेकर, संजय देशपांडे, प्रभाकर बुरांडे आणि विशाल सुरासे यांनी मदत केली तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विवेक लंकेश्वर आणि त्याच्या सदस्यांनी सांभाळले
















