खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे नगराध्यक्ष अमीर पटेल यांच्या हस्ते पूजन
खुलताबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील भद्रा मारुती मंदिर परिसर, मोठी आळी, लहानी आळी, साळीवाडा व पानमळा या भागांत गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांना नगराध्यक्ष सय्यद अमीर पटेल, उपाध्यक्ष नवनाथ बारगळ, नगरसेवक गजानन फुलारे, तोफिक शेख, वाजिद शेख, मोहन तुपे कैलास बारगळ योगेश बारगळ उमेश आवारे सचिन पवार कैलास फुलारे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे. जितेंद्र बोचरे. अंकुश भराड पाटील अप्पाराव देवकर गणेश रोटे शुभम देवकर अनिल फुलारे, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शिवप्रतिमेचे पूजन, अभिवादन व विविध सामाजिक संदेश देत नागरिकांच्या सहभागातून शिवजयंती साजरी करण्यात आली.
















