छत्रपती संभाजीनगर ः मुदतीपूर्वी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) केवळ २६आठवड्याच्या जुळ्यांपैकी वाचलेल्या एका नवजात शिशूला ९९ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तर पाण्यात बुडालेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला मेडीकव्हर हाॅस्पिटल मधील बालरोग तज्ज्ञांना जिवदान देण्यात यश आले. नवजात शिशुंच्या अतिशय गुंतागुंतीच्या आजारांवरही अत्याधुनिक व प्रभावी उपचार केल्यावर त्यांना वाचवण्यात यश येत असुन एनआयसीयूने मृत्युदर शुन्य ठेवण्यात मेडीकव्हर हाॅस्पिटलने यश मिळवले आहे.
मेडीकव्हर हाॅस्पिटलचे नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ डाॅ. राहुल गोसावी म्हणाले की, गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी प्रसवलेल्या बाळांना मुदतीपूर्वी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) बाळांना अनेक धोके असतात. त्यातच २६ आठवड्यांच्या म्हणजे केवळ साडेसहा महिन्यांच्या ८२० ग्रमच्या अत्यंत मुदतपुर्व जुळ्यांच्या प्रसुतीतून एकच नवजात शिशू वाचले. शहरातील दुसऱ्या रुग्णालयातून वाचलेल्या एका बाळाला आई-वडिलांनी आर्थीक परिस्थिती हालाखिची होती मात्र त्यांनी मेडीकव्हर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. विमा कवचाचीही त्यांना साथ मिळाली. एनआयसीयूत ९९ दिवस उपचार केल्यानंतर अखेर नवजात शिशू ठणठणीत होऊन घरी परतले. २८ दिवस व्हेंटीलेटर तर ४५ दिवस बाळ सीपॅप मशीनवर ठेवण्यात आले होते. एकुण ९९ दिवसाच्या नवजात शिशुच्या उपचारात अनेक आव्हाने होती. मात्र त्यावर डाॅक्टरांनी वैद्यकीय उपचार व प्रभावी आणि अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या उपलब्धतेने मात देत चिमुकल्याला जीवदान दिले.
दुसऱ्या रुग्णाबद्दल नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ डाॅ. राहुल गोसावी म्हणाले की, होळीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पाण्यात बुडल्याची तक्रार घेऊन पालकांनी पोटुळ रेल्वे स्टेशन येथून दीड वर्षीय चिमुकला स्वराज अरुण कापसे मेडीकव्हर हाॅस्पिटलमध्ये पालक घेवून आले. सायंकाळी सात वाजता चिमुकला रुग्णालयात दाखल झाला त्यावेळी टोकाच्या थंडीने बेशुद्ध झाले होते. धक्क्याच्या (हायपोथर्मिक शॉक) वैशिष्ट्यांसह, फेफरे आले होते ज्यासाठी इमर्जन्सी सीझर मेड्स आणि इंट्यूबेशन, मेकॅनिकल वेंटिलेशन आवश्यक होते. त्याचा श्वास मंदावून हृदयाची गती कमी होत होती. म्हणून सीपीआर अर्थात जिवनसंजीवनी देवून त्याला पुनरूज्जीवीत करण्यात आले. क्ष-किरण केल्यावर छातीत दोन्ही बाजने हवा भरली (द्विपक्षीय न्यूमोथोरॅक्स) आहे. ज्यासाठी द्विपक्षीय आयसीडी टाकून आपत्कालीन उपचार आवश्यक दिले. दोनदा रक्त संक्रमण आवश्यक असलेल्या मुलास सेप्टिक शॉक दिले. आठ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रतिजैविक आणि व्हेंटिलेटर सपोर्ट दिला. १४ दिवसांच्या बाळांच्या अतिवदक्षता कक्षात उपचार घेतल्यावर तो चिमुकला चालत घरी गेला. पाठपुरावा केल्यावर त्याची न्यूरोलॉजिकल स्थिती सामान्य आहे. त्याचा स्वभावही आता सामान्य आहे. या रुग्णांच्या उपचारात डाॅ. अंगत घुले, डाॅ. पवन मुंदडा, डाॅ. भाग्यश्री जगताप यांच्यासह नर्सिग स्टाफने परिश्रम घेतले.