सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.29, सिल्लोड येथे श्री महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. महेश नवमी निमित्त सायंकाळी शहरातील महेश स्तंभ येथे विधिवत पूजा करून माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते महेश स्तंभास पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थितांना महेश नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, युवानेते अब्दुल समीर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, माजी सभापती रामदास पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, रमेश लाठी, राजेंद्र ठोंबरे, विनोद मंडलेचा,मारुती वराडे, विशाल जाधव, राधकीसन मानधने, मा. नगरसेवक विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, गिरीश शाह, सुदर्शन अग्रवाल, आत्माराम अग्रवाल, डॉ.प्रकाश नवल, भिकचंद कर्णावट, कांतीलाल ओस्तवाल, सुनील ओस्तवाल, रमेश कासलीवाल, फहिम पठाण, वैभव दरगड, गौरव सहारे, महेश जयंती उत्सव समितीचे गोविंद लाठी, गोपाल चांडक, संतोष गिल्डा, सत्यनारायण गट्टानी, सुभाष दरक, योगेश झंवर, विनोदसेट लद्दड, रणछोडदास होलानी, शैलेश झंवर, सचिन लद्दड, सुरेश तापडिया, रमण बडाळे, सागर लद्दड, योगेश दरक, बालाप्रसाद गट्टनी, प्रेमसुख दरगड, घनश्याम वर्मा, शुभम गट्टनी, प्रदीप होलानी, दिलीप झलवार, रमाकांत बडाळे, प्रकाश अग्रवाल आदिंसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.