पैठण प्रतिनिधी:- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विविध भागात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंश बाबत स्थानिकांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गोपनीय माहिती दिली असता स्थानिक गुन्हे शाखा तसेच पाचोड पोलिसांच्या संयुक्त जंबो पथकाने पैठण तालुक्यातील ब्रह्मनगांव डोंगराळ भागात ड्रोन कॅमेराच्या मदतीने दबा धरून केलेल्या कारवाईत जवळपास ९८ गोवंशांची सुटका करून त्यांना चिकलठाणा येथील गो शाळेत वैदयकीय तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. गोवंश सुटके बाबत मराठवाड्यात पोलिसांची ही मोठी कारवाई असून यासाठी पोलीस पथकाचे अभिनंदन होत आहे.
दोन ते तीन दिवसापासून पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ब्राम्हणगावं परिसरातील डोंगराळ भागात बाहेर गावातून गोवंशीय जनावरांची संख्या वाढताना दिसून येत होती.स्थानिक नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे दिवसभर डोंगराळ भागातील कानाकोपऱ्यात लपवून ठेवलेल्या जनावरांचा आढावा घेत सापळा रचून उशिरा रात्री सुमारे २ ते ३ वाजे दरम्यान सदरील ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी नगर,एल सी बी,दंगा काबू पथक,आर सी पी व स्थानिक पोलीस ठाणे असे सुमारे १०० ते १५० पोलीस कर्मचाऱ्यांसह डोंगराळ भागात एकच वेळी छापा मारून कार्यवाही केली,ब्राम्हणगाव परिसराला या कार्यवाहीचे छावणीचे स्वरूप दिसून येत होते.स्थानिक गुन्हे शाखेने आज केलेली कार्यवाही ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठी कार्यवाही असल्याची चर्चा नागरिकांमधून दिसून येत होती.या कार्यवाहीत कात्तलीसाठी जाणाऱ्या किमान ९८ गो वंशीय गाई,लहान वासरे यांची सुटका केली असून तीन आरोपी सह एक पीकअप वाहन ताब्यात घेत मिळून आलेल्या जनावरांना वैद्यकीय तपासणीसाठी १६ जून रोजी सकाळी साधारण १० वाजे दरम्यान खाजगी वाहणाद्वारे चिकलठाना येथे पाठवण्यात आले. कार्यवाही ही स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पोलीस निरीक्षक सतीष वाघ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे,पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव,भगतसिंग दुल्हत,दगडू जाधव,सहाय्यक फौजदार लहू थोटे,पो.ह.श्रीमंत भालेराव,संजय घुगे,दीपेश नांगझरे,वाल्मीक निकम,अंगद तिडके,नरेंद्र खंदारे,नामदेव शिरसाठ,संतोष पाटील, गोपाळ पाटील,विठ्ठल डोके,शेख कासम,पो.ना.दीपक सुरोसे,विजय धुमाळ,अशोक वाघ,आनंद घाटेश्वर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच पोलीस ठाणे पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली.