मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home नांदेड

मुलींच्‍या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्‍यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

admin by admin
18 June 2024
in नांदेड
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

नांदेड,18 जून- महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांची प्रेरणादायी काम हे आपणासाठी ऊर्जा असून गाव पातळीवर बालिका पंचायतच्या माध्यमातून गावागावात महिला सशक्तीकरणाचे पाऊल पुढे पडत आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या युवतींचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

   नांदेड जिल्‍हा परिषद राबवत असलेल्‍या बालीका पंचायत या नाविन्‍यपूर्ण उपक्रमात उत्‍कृष्‍ट कामगीरी केलेल्‍या बालीका पंचायत पुरस्‍कार सोहळा आज मंगळवार दिनांक 18 जून रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात संपन झाला, यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बालिका पंचायत सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधतांना त्‍या बोलत होत्‍या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार आदींची मंचावर उपस्थित होती.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड

     पुढे बोलतांना त्‍या म्‍हणाल्‍या, प्रत्‍येक मुलीला शिक्षण मिळाले पाहिजे तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेवून त्‍यांना सुविधा देण्‍याची जाबाबदारी ग्रामपंचायती आहे. समाजातील मुलगा-मुलगी हा भेद थांबला पाहिजे. मुलींचे सर्व क्षेत्रात सक्षमीकरण हाच या बालीका पंचायतचा हेतू असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. प्रारंभी राजमाता जिजाऊ व वीरांगना अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या प्रतिमांचे पुजन करुन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले.

    जिल्‍हयात 1 फेब्रुवारी 2024 रोजी बालीका पंचायत या नाविन्‍यपूर्ण उपक्रमाची सुरवात करण्‍यात आली. चार महिन्‍याच्‍या कालावधीत सहभागी ग्रामपंचयतींनी राबवलेल्‍या उपक्रमाच्‍या आधारे उत्‍कृष्‍ट काम करणा-या जिल्‍हयातील पाच ग्रामपंचायतींचा स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र व बुके देवून मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते गौरव करण्‍यात आला. यात प्रथम ग्रामपंचायत येरगी ता. देगलूर, व्दितीय आमगव्‍हाण ता. हदगाव तर तृतीय सावरगाव माळ ता हदगाव ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. विष्‍णूपूरी ता. नांदेड व मालेगाव ता. अर्धापूर या पंचायतींना प्रोत्‍साहनपर पुरस्‍कार देण्‍यात आला. या उपक्रमामुळे आमच्‍यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक समस्यांवर काम करण्याची प्रेरणा मिळत असल्‍यांचे बालीका पंचयतच्‍या मुलींनी सांगीतले. बालीका पंचायतने ठरविलेल्‍या उपक्रम, घेण्‍यात आलेले ठराव व अंमलबजावणी यावर पुढील पुरस्‍कार देण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगीतले.

      या कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाल विकास प्रकल्‍प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्‍वीयसहाय्य शुभम तेलेवार, विस्‍तार अधिकारी सुधीर सोनवणे, पातेवार, संबंधीत गावचे सरपंच, जिल्‍हयातील बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, बालीका पंचायतच्‍या सदस्‍या आदींची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Previous Post

लक्ष्मण हाकेंना ईसीजी,कार्यकर्ते भावुक!

Next Post

२१ जूनला ‘गाभ’ चित्रपटगृहात

Related Posts

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा
ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

20 February 2026
एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी
ताज्या बातम्या

एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

20 February 2026
लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड
ताज्या बातम्या

लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड

20 February 2026
Next Post
२१ जूनला ‘गाभ’ चित्रपटगृहात

२१ जूनला ‘गाभ’ चित्रपटगृहात

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस, अंबड बंदची हाक

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस, अंबड बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134