मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगर येथे भेट दिली. व त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी महिलांचे अधिकार आणि सक्षमीकरणाचा विचार मांडला. त्यांच्या या विचारापाठीमागे व त्यांच्या जडणघडीत मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय असून त्यांनी केलेला त्याग, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ, प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात दिलेला पाठिंबा कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वविख्यात बनवण्यात निर्णायक वाटा रमाबाई आंबेडकर यांचा आहे. मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आठवले यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, दलित, वंचित आणि मागासवर्गीयांसाठी सुरू असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित राहून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोबत इतर नेते मंडळी व स्थानिक कार्यकर्ते यांचीही भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांना सन्मानित करून माता रमाबाई आंबेडकर नगर येथे हार्दिक स्वागत करण्यात आले.
त्यावेळी या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी
आर पी आय नेते डी.एम चव्हाण, गंधकुटी बुद्ध विहार समितीचे पदधिकार,संघदीप केदारे, अमित चंदमोरे,रमाई आंबेडकर पुतळा ट्रस्टचे अध्यक्ष,विश्वास कांबळे,तानाजी साबळे,राकेश कांबळे, व भारतीय बौद्ध महासभा शाखा माता रमाबाई आंबेडकर नगर चे सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.