जालना प्रतिनिधी : दिनांक 19 फेब्रुवारी 2025 जाफराबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.मदन मगरे हे होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.डॉ.मदन मगरे यांनी उपस्थिततांना संबोधित करताना आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकताना छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणीचे माता जिजाऊंचे योग्य संस्कार मिळाले. त्यांना शस्त्र हाताळणी, खेळ, सवंगडी गोळा करणे यातच त्यांना युद्धनीतीचे धडे दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुशल अष्टप्रधान मंडळ स्थापन करून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले ज्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरील लाकूड देखील तोडताना तेही जीर्ण झालेले असेल तरीदेखील शेतकऱ्या सोबत विचार विनिमय करून त्यांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देऊन मगच त्या वृक्षाची तोडणी करावी यातूनच महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला येतो. स्त्रियांचा सन्मान राखणे हा सर्वात मोठा हेतू महाराजांच्या कार्यकाळात दिसून येतो अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून महाराजांनी आपली सेना उभारली कमी सैन्याच्या बळावर देखील कुठलाही मुहूर्त न पाहता अमावस्येच्या रात्री देखील महाराजांनी परकीयांवर आक्रमण करून विजय प्राप्त केला यातूनच अंधश्रद्धेला महाराजांनी त्याच काळात मूठ माती दिली. अशा अनेक उदाहरणातून त्यांनी उपस्थित त्यांना सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जगातील अनेक विद्वानांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपापल्या परीने गौरवोद्गार काढल्याचे दिसून येते यांची वेगवेगळी उदाहरणे ही प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी दिली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असून त्यांनी स्वतः कधीच आपल्याला राजा संबोधले नाही. रयतही महाराजांच्या काळात अतोनात सुखी होती. त्यांना कुठली भीती नव्हती. त्याचबरोबर प्राचार्य देशमुख यांनी या भूमीमध्ये दोन क्रांतीसुर्य जन्माला आले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यावरून आपण किती भाग्यवान आहोत! असे उपस्थितांना संबोधित केले. व जाता जाता त्यांनी केवळ या महात्म्यांना त्यांच्या जयंती पुण्यतिथी दिनानिमित्त नव्हे तर त्यांच्या कार्याची आठवण दररोज प्रत्येकाने ठेवावी व तसे आचरण करावे असा संदेशही दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मोठा भाऊ मोरे यांनी केले तर आभार प्राध्यापक बाळकृष्ण बाविस्कर यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.