मुंबई प्रतिनिधी :दिनांक १८/०२/२०२५ रोजी १७:४५ ते १८:५० वा. दरम्यान पंतनगर पोलीस ठाणे येथे मीटिंग करता तंबाखूजन्य पदार्थ विकणारे ४५ टपरी चालक व मालक यांना बोलावून त्यांना सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (Cotpa) कायदा अंतर्गत माहिती दिली तसेच शाळा व कॉलेज च्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याबाबत माहिती दिली. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस ठेवल्यास करण्यात येणाऱ्या कारवाई विषयी देखील माहिती दिली.तंबाखू विक्री न करण्याबाबत त्यांचे मतपरिवर्तन करण्यात आले. शालेय परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले आहे सोबत कडक शब्दात त्यांना सूचना दिल्या आहेत त्यातील बऱ्याच लोकांनी व्यवसाय बदलणार असल्याचे सांगितले तसेच त्यांना नवीन कायद्याची सविस्तर माहिती दिली व सायबर सुरक्षा बाबत जनजागृती देखील केली, सदर मिटिंग ला पंतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे, पी.आय. खतीब, निर्भया अधिकारी ए.पी.आय. जाधव, रवी आव्हाड,उमेश आव्हाड आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.