छत्रपती संभाजीनगर, दि.17 :- 24 वर्षानंतर सन 2000-01 (10 वी तुकडी ब) विद्यार्थ्यांचा स्नेहसंम्मेलन मेळावा शनिवार दि.15 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पाडला. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद प्राचार्य भरत म्हस्के, मुख्याध्यापिका कविता साबळे,जयश्री भांरबे, रणमले मॅडम, सर्व शिक्षक नागरे सर, उगले सर, माळी सर, लालसरे सर, चौधरी सर, हिवाळे सर, पाटील सर, गवई सर उपस्थित होते.
सर्व शिक्षक व शिक्षिका यांचा विद्यार्थी व विद्यार्थ्यांकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदाने जुन्या आठवणीना उजाळा देऊन व पुढील आयुष्य सुख, समृद्धी भराभराट होऊ असे विद्यार्थी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाळेचे (10 वी तुकडी ब) वर्गाचे माजी विद्यार्थी व विद्यार्थांनी आपली पुन्हा एकदा ओळख करुन दिली. शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन पुढे सामाजिक जीवनात यशस्वी झालेले विद्यार्थी यांनी आपला परिचय करुन दिला. यामधील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय सेवा, कला क्षेत्र, सामाजिक क्षेत्र,व्यावसायिक ठेकेदार,बँकिग तसेच शेती क्षेत्रात यश मिळवले. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित केले. कार्यक्रमास सागर बुजुर्गे, दिनेश कोलते, धम्मरत्न रगडे, विजय जगधने, सचिन भुईगड, सचिन बिरारे, संदीप लहाने, सतिश आहेर, सतीश दहीहंडे, सचिन पेढे, कृष्णा सोनवणे, मिलिंद पानपाटिल, बाबासाहेब घुगे,सतीश वाबळे, प्रवीण महेंद्रकर, विजय आठवले तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी तेजस्विनी टेकावडे, मोसमी सोनखेडे, स्वाती देशमुख, रुपाली गंगापूरकर, प्रियंका नेरपगार, सुरेखा कोलते, ज्योती वाकडे उपस्थित होते.
यावेळी तेजस्विनी टेकावडे, मोसमी सोनखेडे, स्वाती देशमुख, रुपाली गंगापूरकर, प्रियंका नेरपगार, विजय जगधने, सचिन भुईगळ, बाबासाहेब घुगे,सतीश वाबळे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमास झाल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सचिन भुईगळ, रुपाली गंगापूरकर, विजय जगधने, बाबासाहेब घुगे यांनी केले. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आपले शाळेचे शिक्षकांचे आभार व्यक्त केले.