मुंबई (घाटकोपर) : प्रतिनिधी
माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व, हृदयविकार आजाराचे व इतर आजाराचे वाढते प्रमाण पाहता चिंतेचे कारण बनले आहे.हृदयविकाराच्या आजाराने अचानक होणारा मृत्यू हे आरोग्याकडे व आहाराकडे दुर्लक्ष केल्याचे महत्त्वाचे कारण आहे. या अनुषंगाने समाजसेवक,आयोजक,अविनाश कदम, व जनसेवा आरोग्य ट्रस्ट चे अध्यक्ष, डॉ.एस.आर.विश्वकर्मा यांच्या वतीने विश्वकर्मा हॉस्पिटल येथे दि.२ फेब्रुवारी, रोजी स. ११ ते ३ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांसाठी मोफत मधुमेह तपासणी,हाडांची तपासणी, ईसीजी तपासणी, स्त्रियांचे आरोग्य तपासणी, बॉडी मास्क इंडेक्स,आहार सल्ला, वजन उंची आदी आजारावर उपचार करण्यात आले होते.दरम्यान डॉ.राकेश तीरमाले (एम.डी. कार्डिओलॉजिस्ट), डॉ.एस.आर विश्वकर्मा (बी. ए.एम. एस ,आयुर्वेदिक सल्लागार), जनसेवा आरोग्य ट्रस्ट,(अध्यक्ष),आदी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करत सर्व रुग्णांना आरोग्यविषयक योग्य सल्ला देखील देण्यात आला होता.तरी विभागातील सर्व गरजू रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे पुरे पुर लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजक अविनाश कदम यांच्या वतीने करण्यात आले होते.त्यावेळी विभागातील समाजसेवक,कार्यकर्ते,दीपक भोसले,प्रशांत तोरणे,अशोक हिरे,काका गांगुर्डे,अनिल कदम,कुलदीप सोनवणे,बापू धुमाळ,राहुल जाधव,अर्जुन मोरे,अशोक बछाव,आदी उपस्थित होते