मुंबई : दि.26 जानेवारी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा घाटकोपर पूर्व येथील गुरू नानक इंग्लिश हायस्कूल विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग यांनी प्रथमतः स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये शहिद झालेल्या सर्व शहिदांना आदरांजली वाहिली. वर्ष 2023-2024 मध्ये दहावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यासाठी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.त्यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील बोलवण्यात आले.व पुढे मुख्याध्यापक नरिंदर कौर यांनी विद्यार्थ्याना शालेय जीवन व आरोग्य कसे निरोगी राहील या गोष्टींवर मार्गदर्शन केले.मुख्याध्यापकानी व शिक्षक वर्गानी शाळेत दहावीत प्रथम,द्वितीय व तृतीय विद्यार्थांना मिळालेल्या गुणावबद्दल त्यांचे खूप कौतुक केले.या वेळी क्रार्यक्रम चे अध्यक्ष शाळेचे मुखध्यापक नरिंदर कौर ह्या होत्या तर कार्यक्रमचे सूत्रंचालन शिक्षक पूनम सुर्वे यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित घेण्यात आलेल्या शाळेतीतेल विद्यार्थ्यांचे भाषणे,नृत्य,गीते नाटक व घाटकोपर विभागात रॅली काढण्यात आली, असे विविध कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज व संतोष शिक्षक यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते.