मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

अधिवेशनात देशभरातील अभ्यासकांचा सहभाग

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाईड सायन्सेस आणि दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आयएपीटी) आरसी-०८ व सब आरसी-०८ एफ (मराठवाडा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयएपीटी महाराष्ट्र स्टेट कन्व्हेन्शन २०२६’ या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांच्यासह बार्क-यूजीसी–डीएई केंद्राचे संचालक डॉ.पी.डी.बाबू, आयएपीटी महाराष्ट्र प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष प्रा.महेश शेट्टी, डॉ.एम.एस.जोगड, प्रो.जी.के.बिचले, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, एमेरिटस प्राध्यापक डॉ.के.एम.जाधव, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

‘रिव्होल्यूशनायझिंग फिजिक्स एज्युकेशन : इंटिग्रेटिंग क्वांटम टेक्नॉलॉजीज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही या अधिवेशनाची मुख्य संकल्पना असून आधुनिक भौतिकशास्त्र शिक्षणातील बदलते प्रवाह, कृत्रिम बुद्धिमत्ता व क्वांटम तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, संशोधनातील नवे क्षितिज आणि भविष्यातील शैक्षणिक दिशा यावर सखोल मंथन या परिषदेत होणार आहे.

ईसी मेंबर प्रो. डॉ. शिवानंद मस्ती यांनी विद्यार्थ्यांसाठी तरंग, प्रकाश, बल, दाब, चुंबकत्व अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग सादर केले. त्यांनी सोप्या भाषेत आणि रोचक पद्धतीने प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांना विज्ञानातील तत्त्वे समजावून सांगण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलनाने झाली. अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख यांनी प्रास्ताविक करत अधिवेशनाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. अधिवेशनाच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनात आयएपीटी ‘अन्वेषिका/ज्योत’मराठवाडा विभागात ठेवली असून ती संपूर्ण भारतभरातील विविध संस्थांमध्ये जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंचल कपूर आणि नंदिनी सिंग यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.क्रांती झाकडे यांनी केले.

या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार खालीलप्रमाणे आहेत :

कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ : एमजीएम विद्यापीठात बी.एस्सी., एम.एस्सी., पीएच.डी. तसेच क्वांटम फिजिक्ससारख्या आधुनिक विषयांचे अध्यापन केले जाते. भौतिकशास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थी ‘युनिक इनोव्हेटर्स’ म्हणून घडत आहेत. या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि संशोधनासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा. महेश शेट्टी : कृत्रिम बुद्धिमत्ता आज विविध माध्यमांतून आपल्याला माहिती पुरवत आहे. आपण एआयचा वापर केला किंवा नाही केला तरी एआय आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्यामुळे तरुण संशोधकांनी अशा परिषदांमधून कल्पनांची देवाणघेवाण करून नव्या संकल्पना आत्मसात कराव्यात आणि संशोधन क्षेत्रात नावीन्यपूर्ण वाटा चोखाळाव्यात.

प्रो.जी.के.बिचले : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयएपीटीची सुरुवात शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये भौतिकशास्त्राविषयी आवड निर्माण करण्यासाठी झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील ज्ञान अधिक व्यापक करण्यासाठी अशा व्यासपीठांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

या राज्यस्तरीय अधिवेशनामुळे भौतिकशास्त्र विषयातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र येऊन नव्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आगामी सत्रांमध्ये विविध तज्ज्ञांची व्याख्याने, संशोधन सादरीकरणे आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

Previous Post

मराठवाडयात १२ लाख १७ हजार ग्राहकांकडे बसविले स्मार्ट वीज मीटर

Next Post

बीज प्रदर्शनाचे ‘ बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

Related Posts

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!
ताज्या बातम्या

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

14 February 2026
तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी  वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार
ताज्या बातम्या

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

14 February 2026
प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..
ताज्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

14 February 2026
Next Post
बीज प्रदर्शनाचे  ‘ बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

बीज प्रदर्शनाचे ' बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

२० व्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत(नागपूर) यांचा रविवारी छ.संभाजीनगर येथे जाहीर सत्कार

२० व्या अ.भा.विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत(नागपूर) यांचा रविवारी छ.संभाजीनगर येथे जाहीर सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

14 February 2026
तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी  वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

14 February 2026
प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी ‘यादें’ या मालिकेत दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत..

14 February 2026
भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ

भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज : पँथर नामदेव ढसाळ

14 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

14 February 2026
तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी  वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

14 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134