मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सावित्री प्रतिष्ठान, कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन,(CPAA) यांच्या संयुक्त विद्यमानाने घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर शाखा १३३/१२५, २१ जून रोजी,सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत पहिला मजला शाहिद स्मारक सभागृह घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७५ येथे विशेष मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी स्थानिक महिलांनी प्रचंड संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत लाभ घेतला व शिबिराची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसेच्या महाराष्ट्रराज्य सरचिटणीस रिटा सुरेश गुप्ता व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरांमध्ये महिला कर्करोग तपासणी अभियाना अंतर्गत कर्करोग तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मुख,स्तनाचा, पॅप स्मिअर, एच.पी.व्ही.कान,नाक,घसा, ब्लड प्रेशर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग व इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.
कर्करोगाचे लवकर निदान महत्त्वाचे आहे.कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास, त्यावर प्रभावीपणे उपचार करता येतात.त्यामुळे, नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी, सावित्री प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ही कॅन्सर तपासणी मोहीम महिलांमध्ये स्तनांची स्वतःची तपासणी करण्याबाबत जागरूकता करण्यात आली. मुलींना त्यांच्या आईंना दर महिन्याला स्तनांची स्वतःची तपासणी करण्यास भाग पाडण्याचे आवाहन देखील करण्यात आले.जेणेकरून गाठी आणि स्तनाच्या कर्करोगाच्या इतर कोणत्याही सुरुवातीच्या लक्षणांची तपासणी करता येईल. तर ते कसे करायचे याबद्दल ची माहिती कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन,(CPAA) च्या कार्यकारी संचालक, नीता मोरे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन,(CPAA) चे डॉ.नीता मोरे व डॉ.मीनल परब यांचे महत्वाचे योगदान लाभले. या कार्यक्रमादरम्यान डॉ.नीता मोरे व इतर डॉक्टर वर्ग यांनी कर्करोगाविषयी उपस्थित महिलांना सविस्तर माहिती दिली.या शिबिराला डॉ.मीनाक्षी मानकामे,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.तृप्ती पोयरेकर, डॉ.संजय घिलदियाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सुमेधा पाथडे, तसेच मनसे घाटकोपर उपविभाग अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी,१३३ चे शाखा अध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम,१२५ चे शाखा अध्यक्ष कुणाल केदारे, घाटकोपर महिला विभाग अध्यक्ष कविता राणे व मनसेचे सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.