ठाणे :- शहापूर विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार दौलत भिका दरोडा यांचा पुतण्या हरीश बुधा दरोडा (वय ४१) यांचे गुरुवारी अचानक निधन झाल्याची घटना समोर आली आहे.हरीश दरोडा यांना आदिवासी विकास महामंडळातील दीड कोटीच्या भात खरेदी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. सद्या ते पोलीस कोठडीत होते.
शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रात दीड कोटींचा भातखरेदी घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या व साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा यांनी व अन्य जणांनी महामंडळाची सुमारे दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यास पोलिसांनी दीड वर्षानी अटक केली होती.गेल्या दीड महिन्यांपासून ते पोलीस कोठडीत होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटकाआल्याचे बोलले जाते. हरीश दरोडा यांचे अचानक निधन झाल्याने शहापूर तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे.
















