मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

मराठवाडयात १२ लाख १७ हजार ग्राहकांकडे बसविले स्मार्ट वीज मीटर

ग्राहकांनी घेतला दोन कोटी रूपयांच्या वीज सवलतीचा लाभ

admin by admin
14 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ फेब्रुवारी २०२६ :- महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी अर्थात टाईम आॅफ डे मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रति युनिट ८० पैसे ते १ रूपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विघुत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षासाठी निश्चित केलेल्या वीज दरानुसार घरगुती ग्राहकांना टीओडी प्रमाणे वीज दरात सवलत दि. १ जुलै २०२५ पासून सुरू आहे. या अंतर्गत मराठवाडयातील महावितरण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड या परिमंडलात १२ लाख १७ हजार २२८ ग्राहकांना सरासरी १ कोटी ९८ लाख १३ हजार रूपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मिटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रिडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात. घरातील विजेचा वापर दर एक तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येते. त्यामुळे वीज वापरावर देखिल ग्राहकांचे थेट नियंत्रण राहणार आहे. टाईम आॅफ डे प्रणाली नुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औधोगिक नंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे.
सन २०२५ ते २०३० या पाच वर्षासाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाईम आॅफ डे अर्थात टीओडी नुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रूपया सवलत मंजूर केली आहे. यात दि. १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, सन २०२७ मध्ये ८५ , सन २०२८ व २९ मध्ये ९० पैसे तसेच सन २०३० मध्ये १ रूपये प्रति युनिट सवलत मिळणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत वीज ग्राहक घरातील प्रामुख्याने वाशिंग मशिन, गिजर, इस्त्री, एअर कडिंशनर व जास्त वीज वापर असणा—या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा अधिक फायदा होणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मिटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.
स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रिडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंंगच्या तक्रारी जवळपास संपूष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची माहिती सर्व संबंधित ग्राहकांच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर उर्जा प्रकल्प आहे. त्यातून वापरलेल्या व शिल्ल्क राहिलेल्या विजेचा लेखा जोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मिटरचे प्रमुख फायदे आहेत. या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही. तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा. अशी सध्याची मासिक बिलिंग पध्दत पुढेही राहणार असल्याचे महावितरणकडू स्पष्ट करण्यात आले आहे.

स्मार्ट टीओडी मिटरमुळे मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड,धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली महावितरण मंडलात देण्यात येणारी सवलत लाख रूपये पुढील प्रमाणे.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

मंडल कार्यालय स्मार्ट मीटरचे ग्राहक मिळालेला लाभ
छत्रपती संभाजीनगर शहर १,१२,९०६ ३०.६६
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण २,१८,११८ २९.५५
जालना १,००,९४७ १४.९०
छत्रपती संभाजीनगर ४,३१,९६४ ७५.१०
परिमंडल

बीड १,१३,१९२ १९.६०
धाराशिव १,४२,०५४ १६.६७
लातूर २,३८,९२२ ३४.२३
लातूर परिमंडल ४,९४,१६८ ७०.५०
नांदेड १,९१,८४५ ३३.५५
हिगोंली ४८,३०८ ०७.३८
परभणी ५०,९४३ ११.६०
नांदेड परिमंडल २,९१,०९६ ५२.५३
मराठवाडा एकूण १२,१७,२२८ १९८.१३

स्मार्ट मीटर म्हणजे अचूकता आणि बचतीचा संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे आणि महावितरणच्या आधुनिक सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी केले आहे.

Previous Post

रोहित पवारांनी केलेले दावे धक्कादायक

Next Post

एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न

बीज प्रदर्शनाचे  ‘ बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

बीज प्रदर्शनाचे ' बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134