मुंबई : घाटकोपरमध्ये १३मे रोजी पडलेल्या होर्डिंग्ज च्या विरोधात विविध पक्ष,संघटना, मंडळे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, आणि मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल करूनही कारवाई नाही. व त्यातच जय भीम आर्मीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष कुणाल तुरेराव व स्थानिक माजी नगरसेवक सुरेश आवळे यांनी ही या होर्डिंग्ज संदर्भात वेळोवेळी विचारणा करत तक्रारी दाखल केल्या या विषयांतर्गत गेल्या तीन वर्षापासून वारंवार तक्रारी दाखल करूनही अद्याप कारवाई झाली नाही.
होर्डिंग्ज लावणाऱ्या कंपनीने मोठ्या प्रमाणत विनयभंग केल्याचे तक्रारी मध्ये म्हटले आहे.याकडे मुख्यमंत्रीसह प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू, ७४ जण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांना दिले आहेत, असे ते म्हणाले. व या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च व या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे ही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माध्यमांशी बोलताना त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो च्या संख्येने जखमी व मृत लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून,अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. तसेच या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून याप्रकरणी दोषी आढळल्या त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.