मुंबई: काल कुर्ला पश्चिम विभागात एका मतदान केंद्रावर निवडणूक बंदोबस्तात तैनात असलेले घाटकोपर वाहतूक नियंत्रण कक्ष येथील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार हे कर्तव्य बजावत असताना त्यावेळी त्यांना सदर ठिकाणी एक पैशांनी भरलेले पॉकेट सापडले.त्या पॉकेट मध्ये रोकड ५००० रुपये व आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड व काही महत्वाचे काही कागदपत्र होते.सदर सापडलेले पॉकेट महिला वरिष्ठ ट्रॅफिक पोलीस अधिकारी रजनी साळुंके यांच्या ताब्यात देण्यात आले.व त्यांनतर पीडित यांचा शोध घेण्यात आला अखेर काही तासानंतर पिडिताचा शोध लागला.
नंतर सापडलेले पॉकेट पीडिताला प्रामाणिकपणे परत करण्यात आले.त्यावेळी मतदान केंद्रावर उपस्थिती असलेले नागरिक यांनी अश्विनी पवार यांचे धन्यवाद करत कौतुक केले व त्यांची चर्चा सर्व पोलीस विभागात सुरू आहे.