मुंबई (घाटकोपर) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्ताने माता रमाबाई आंबेडकर नगर येथे शाळकरी मुलांची अभिवादन रॅली महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते त्रिरत्न बुद्ध विहार, व जुनी रमाबाई सहकार नगर येथे काढण्यात आली. विभागातील सर्व शाळकरी विद्यार्थी, पालक व इतर जनतेने रॅली मध्ये सहभाग घेतला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित रॅलीची सांगता लहान मुले महिला ह्यांच्या भाषणांनी दुमदुमून निघाली नवी चेतना देणाऱ्या ह्या रॅली चे आयोजन प्राजक्ता दि. जगताप, रोहित जगताप, दिनेश जगताप निशा जगताप, स्वप्नील अहिरे व मेत्ता ग्लोबल फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले, सांगता समारंभ त्रिरत्न बुद्ध विहार जुनी रमाबाई सहकार नगर येथे समिती अध्यक्ष मुकेश जगताप, सतीश जगताप, उषा साबळे, तेजस साबळे, अर्जुन बेलखडे व इतर सहकारी यांच्या मार्गदर्शनाने झाले, विभागातील पंतनगर पोलीस ठाणे उपनिरीक्षक किसन माने व इतर महिला पोलीस कर्मचारी यांनी ही मुलांना उपदेशन केले. सावित्रीबाई ह्यांच्या जयंती निमित्ताने सर्व परिसर चैतन्यमय झाला व लहान मुलांना राष्ट्र भक्तीचे धडे मिळाले.