मुंबई प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्ताने घाटकोपर पूर्व, माता रमाबाई आंबेडकर नगर येथील पंचशील मित्र मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती येथे वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्र. १३३ चे वार्ड अध्यक्ष रोहित राजाराम जगताप ह्यांच्या मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच मोबिन अन्सारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले ह्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष विश्वास कांबळे गुरुजी पंचशील बुद्ध विहार समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक निकाळजे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल खंडागळे. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष चंदन निकाळजे. वंचित बहुजन आघाडी महिला तालुका अध्यक्ष भारती यादव. वार्ड क्रं १३३ चे महा सचिव रोहित वाहुळे त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मुकेश जगताप, सतीश जगताप. भारतीय लोक अधिकार संघाचे अध्यक्ष सुहास कारंडे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष हुशार मागाडे. पंचशील महिला मंडळ, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते सुनील येडे, श्रीकांत यादव, दीपक आव्हाड, परशुराम भंडारे, अक्षय पवार, शैलेश जाधव, रुपेश जाधव, श्रेयस पवार, अजय बनसोडे, रमेश साळवे, राजेश दुगड, नीतू वाघमारे महेंद्र गरुड सुशांत कदम, दिनेश जगताप हे सर्व उपस्थित होते ह्या सर्व मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले.