छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे छ. संभाजीनगर जिल्हयासह मराठवाडयातून अनेक रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येतात.
अति गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ट्रामा केअर (टीआयसीयु) या वार्डात भरती करण्याकरीता आणण्यात येते. परंतु, या वार्डामध्ये रुग्णांची संख्या जास्त असल्याकारणाने काही रुग्णांना भरती न करता वेटींग मध्ये ठेवले जाते. उपचार वेळेवर न मिळाल्याने अनेक रुग्णांना जिव गमवावा लागतो, त्यामुळे अतिरिक्त टीआयसीयू वार्ड असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्र.११ समोरील एक्स-रे, सोनोग्राफी व सिटी स्कैन मशीन दुरुस्ती करुन सर्व एकाच ठिकाणी बसविण्यात यावे, जेणेकरुन रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार घेणे सोयीस्कर होईल व रुग्णांची परवड थांबेल. घाटी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या आजारावर उपचार घेण्याकरीता अनेक रुग्ण ॲडमिट आहे, मात्र, घाटीतील लाखो रुपयांची एन्जोप्लास्टी मशीन धुळ खात पडल्याने रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. व अनेक रुग्ण हे शेवटचा श्वास मोजत आहे, त्यामुळे एन्जोप्लास्टी मशीन दुरूस्ती करून रुग्णांना त्याचा लाभ द्यावा. या मागण्या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाच्या वतिने अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, पवन पवार, आकाश साबळे यांच्या सह्या आहेत.