नीट परीक्षेतील गैरव्यवहार आरोपाप्रकरणी काँग्रेस आक्रमक भूमिका घेतांना पाहायला मिळत आहे. वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेत विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. अशात आता संभाजीनगरमध्ये आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येत असून, जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन होत असून मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.