एका कार्यकर्त्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे पाय धुवायला लावत आहे. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. 21 व्या शतकात चाललो, काय संदेश समाजाला चाललो, या देशात बघितले पाहिजे… पाय धुणार असो की धुवून घेणारा असो.. या पद्धतीचं वर्तण करणं शोभणार नाही. भविष्यात त्यांची जे वृत्ती आहे बुद्धीभेद जो झाला. ती दुरुस्त केली पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.